IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर्सच्या दिशेने, ऑर्डर्सचा पाऊस पडतोय, स्टॉक अप्पर सर्किटवर, खरेदी करणार?

IRFC Vs Titagarh Rail Share | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने अहमदाबाद मेट्रो रेल फेज-2 प्रकल्पासाठी गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार केला आहे. याशिवाय कंपनीने आपले जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल देखील जाहीर केले आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 808.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 866 रुपये किमतीवर पोहचला होता. तर दिवसा अखेर हा स्टॉक 5.85 टक्के वाढीसह 841.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
टिटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 867.70 रुपये होती. टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 40 टक्के वाढवले आहेत. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 160 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 436 टक्के परतावा कमावून दिला आहे.
टिटागड रेल सिस्टीम कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने GMRC सोबतचा करार केला आहे. या करारा अंतर्गत अहमदाबाद मेट्रो रेल फेज-2 प्रकल्पासाठी कंपनीला 30 स्टँडर्ड गेज गाड्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा चाचणी, कमिशनिंग आणि प्रशिक्षण संबंधित काम देण्यात आले आहे. हे अत्याधुनिक मेट्रो कार पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्यातील उत्तरपारा याठिकाणी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या उत्पादन केंद्रात बनवले जाणार आहे.
टिटागड रेल सिस्टीम कंपनीला 29 ऑगस्ट 2023 रोजी देण्यात आलेल्या लेटर ऑफ एक्सेप्टन्स पासून 70 आठवड्यांच्या आत प्रोटोटाइप वितरित दिला जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीला 94 आठवड्याची डिलिव्हरी पूर्ण होण्याची मुदत देण्यात आली आहे.
टिटागड रेल सिस्टीम ही कंपनी मुख्यतः रेल्वे वॅगन्स बनावरणी खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. उत्तरपारा व्यतिरिक्त, या कंपनीकडे पश्चिम बंगालमधील टीटागढ आणि राजस्थानमधील भरतपूर याठिकाणी देखील अभियांत्रिकी पायाभूत सुविधा केंद्र आहेत. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत टिटागड रेल सिस्टीम कंपनीमे 54 टक्के वाढीसह 935 रुपये महसूल वार्षिक संकलित केला होता.
मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 607 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. टिटागड रेल सिस्टीम कंपनीने या तिमाहीत 46 टक्के वाढीसह 70 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील वर्षी कंपनीने 48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRFC Vs Titagarh Rail Share NSE 21 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं