Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा शेअर तेजीत, इंडियन हॉटेल्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस, किती मिळणार परतावा?

Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या महसुल संकलनात 18 टक्के आणि निव्वळ नफ्यात 37 टक्के वाढ झाली आहे.
आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 2.04 टक्के वाढीसह 382.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सप्टेंबर तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीने 18 टक्के वाढीसह 1481 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर कंपनीचा EBITDA 26 टक्क्यांच्या वाढीसह 402 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचा EBITDA मार्जिन 27.2 टक्के होता. इंडियन हॉटेल्स कंपनीने 37 टक्क्यांच्या वाढीसह 167 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात आणि महसूल संकलनात दोन अंकी वाढ पाहायला मिळत आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडे 125 ठिकाणी मालमत्ता आहेत. या मालमत्ता कंपनीच्या मालकीच्या किंवा भाडेतत्त्वावरील मॉडेलमध्ये आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीने 8 नवीन हॉटेल्सचे उद्घाटन केले आहे. 17 नवीन हॉटेल्ससंबंधित करार कंपनीने केले आहेत. सध्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या एकूण हॉटेल्सची संख्या 82 वर पोहोचली आहे. हॉटेल्स उद्योगाला आर्थिक वाढ आणि ग्राहकांच्या खर्चात सुधारणा झाल्याने चांगला फायदा मिळत आहे.
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरवर 492 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते इंडियन हॉटेल्स कंपनीमध्ये देशांतर्गत मागणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने 436 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. या किंमत पातळीपासून स्टॉक 14 टक्के स्वस्त झाला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सच्या सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 31 टक्के अधिक आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Indian Hotels Share Price NSE 30 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं