Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत मोठी अपडेट, गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली, नेमकं कारण काय?

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,783 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या नफ्यात वाढ झालेली ही सलग चौथी तिमाही ठरली आहे. टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या ब्रिटीश युनिट जॅग्वार लँड रोव्हर कंपनीच्या अप्रतिम कामगिरीमुळे टाटा मोटर्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 1.51 टक्क्यांच्या वाढीसह 636.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 1,004 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 2.55 टक्के वाढीसह 652.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 1,05,128 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 79,611 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जग्वार लँड रोव्हर कंपनीने या तिमाहीत 6.9 अब्ज पौंड महसूल संकलित केला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढला आहे. उच्च घाऊक विक्री, खर्चात कपात आणि मागणीतील वाढ यामुळे टाटा मोटर्स कंपनीच्या महसूल संकलनात वाढ पाहायला मिळत आहे.
टाटा मोटर्स कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “या तिमाहीत कंपनीच्या सर्व व्यवसाय आणि विविध योजनांचे परिणाम पाहून आनंद वाटत आहे”. टाटा मोटर्स कंपनीने सांगितले की कंपनी समोर अनेक आव्हाने असून देखील वाहनांच्या मागणीबाबत कंपनी खूप आशावादी आहे. सध्या जी आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा कंपनीच्या व्यवसायावर अल्प परिणाम पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री वार्षिक 2.7 टक्क्यांच्या घसरणीसह 1,39,000 युनिट्सवर आली आहे.
कंपनीच्या मते, “नवीन उत्पादनांची डिलिव्हरी सुरू झाल्यामुळे, वर्षाच्या उत्तरार्धात कंपनीच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. टाटा मोटर्स कंपनीने टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड आणि Jaguar Land Rover PLC ने JLR च्या इलेक्ट्रिफाइड मॉड्युलर आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मचा परवाना मिळविण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE 03 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं