Stocks To Buy | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली टार्गेट प्राईस, अल्पावधीत होईल मोठी कमाई

Stocks To Buy | एस्कॉर्ट्स कुबोटा या फार्म आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचा नफा दुप्पट झाला आहे. या कंपनीचे शेअर्स दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये देखील सामील आहेत.
ब्रोकरेज हाऊस नुवामाने एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन स्टॉक 4000 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3,077 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका वर्षात एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची 350 टक्क्यांनी वाढली आहे. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटा स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 3,146.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीने आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीने 72 टक्के वाढीसह 263 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला आहे. तज्ञांच्या विश्वास आहे की, एस्कॉर्ट्स कंपनी पुढील पाच वर्षांत आपल्या उद्योगाच्या दुप्पट विकास दर साध्य करू शकते. तज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2023-26 आणि 2026-28 मध्ये कंपनीचा महसूल CAGR 23 टक्के आणि 20 टक्के रही शकतो. आणि कंपनीचा EPS अनुक्रमे 44 टक्के आणि 33 टक्के राहू शकतो.
एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचा निव्वळ नफा सप्टेंबर 2023 तिमाहीत दुप्पट वाढला आहे. आणि कंपनीने 223 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बांधकाम आणि रेल्वे उपकरण विभागातील मजबूत विक्रीमुळे एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीने 99 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीने या तिमाहीत 2154 कोटी रुपये महुसल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1969 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीची ट्रॅक्टर विक्री 22,024 युनिट्सवर पोहचली आहे, जी मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत 23,703 युनिट्स नोंदवली गेली होते.
शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचे शेअर्स सामील आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला त्यांचा पोर्टफोलिओ हाताळत आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचे 1.6 टक्के भाग भांडवल होते. याचे एकूण मुल्य 550.8 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 25 विविध कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. त्यांचे एकूण मुल्य 35,237.7 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 08 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं