Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअर'वर लोकं तुटून पडले, व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा घ्यावा?

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. व्होडाफोन आयडिया या कर्जबाजारी टेलिकॉम कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 14.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. एकेकाळी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 120 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 13.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने आयकर विभागाला 2016-17 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीने भरलेले 1,128 कोटी रुपये रक्कम परत देण्याचा आदेश जारी केला आहे. आयकर विभागाला ही रक्कम परत करण्यासाठी 30 दिवसांची मिळत देण्यात आली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने आयकर विभागाविरोधात न्यायालयात खटला भरला होता.
न्यायमूर्ती के आर श्रीराम आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने आयकर विभागाचे असेसिंग ऑफिसर निष्काळजी असल्याचे मत मांडले आहे. अशा स्थितीत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. म्हणून न्यायालयाने संबंधित आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने 8737.9 कोटी रुपये तोटा नोंदवला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात व्होडाफोन आयडिया कंपनीला 7559.55 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने 10716.3 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 10,655.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. अनेक प्रयत्न करून देखील व्होडाफोन आयडिया कंपनी अद्याप कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू शकली नाहीये.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vodafone Idea Share Price NSE 10 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं