Deepak Nitrite Share Price | करोडपती बनवणारा शेअर दीपक नायट्रेट बाबत तज्ज्ञांना काय वाटतंय? शेअरबाबत काय निर्णय घ्यावा?

Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स मागील दोन महिन्यांत आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवरून 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
12 वर्षापूर्वी ज्या लोकांनी दीपक नायट्रेट स्टॉकवर 71000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी दीपक नायट्रेट स्टॉक 1.40 टक्के वाढीसह 2,149.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज दीपक नायट्रेट शेअर 0.45% वाढीसह 2,159 रुपयांवर ट्रेड करत आहे.
18 नोव्हेंबर 2011 रोजी दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स 14.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 2149 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 7 फेब्रुवारी 2023 रोजी दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स 1,731.00 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 8 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत या कंपनीचे शेअर्स 37 टक्क्यांच्या वाढीसह 2,372.95 रुपये किमतीवर पोहचले होते.
दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या आर्थिक वर्ष 2025 च्या कमाईच्या मानाने 24 पट अधिक आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, वाढत्या खर्चामुळे कंपनीच्या मार्जिनवर जबरदस्त दबाव राहण्याची शक्यता आहे.
दीपक नायट्रेट कंपनीला फिनॉल प्लांट पूर्ण क्षमतेने काम करत आहे. पुढील काळात या स्टॉकमध्ये वाढीचे संकेत मिळत नाही. म्हणून ब्रोकरेज फर्मने दीपक नायट्रेट स्टॉकवर 1419 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Deepak Nitrite Share Price NSE 16 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं