IRFC Vs Titagarh Rail Share | रेल संबंधित शेअर्सचा धुमाकूळ! प्रतिदिन 10 टक्क्याने अप्पर सर्किट हीट होतोय, पैसा गुणाकारात वाढतोय

IRFC Vs Titagarh Rail Share | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत 430 टक्के वाढला आहे. 14 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 160.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स 900 रुपयेच्या पार गेले आहेत.
मागील एका वर्षात टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 384 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 831 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक 10.00 टक्के वाढीसह 922.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स 3.74 टक्के वाढीसह 849.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,719 कोटी रुपये झाले. 18 ऑक्टोबर 2023 रोजी टिटागड रेल स्टॉक 867 रुपये किमतीवर पोहचला होता.
तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 988 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तांत्रिकदृष्ट्या टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 60.7 अंकावर आहे. यावरून समजते की टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.
टिटागड रेल सिस्टिम कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. एसबीआय सिक्युरिटीज फर्मने टिटागड रेल कंपनीच्या शेअर्सवर 988 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
टीटागड रेल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 28,212 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते पुढील तीन वर्षांमध्ये टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीसाठी 600-700 कोटी रुपये नियोजित भांडवली खर्चासह वाढ साध्य करण्याची उत्तम स्थिती आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRFC Vs Titagarh Rail Share NSE 17 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं