मराठा आरक्षणाच्या जल्लोषात 'मुका मोर्चा' म्हणून खिल्ली उडवणारे सामील का? : सचिन सावंत

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टाने काल निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर विधान भवनात भारतीय जनता पक्ष आणि सेनेच्याचं आमदारांनी नव्हे तर विरोधी पक्षांनी देखील जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर जुन्या आठवणींना उजाळा देत जोरदार निशाणा साधला. यात त्यांनी सामना दैनिकातून ‘मुका मोर्चा’ म्हणणारे देखील सामील का? असा प्रश्न सचिन सावंत यांनी केला.
मुंबई हायकोर्टात काल मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. कोर्टाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.
दरम्यान कोर्टाच्या या निर्णयावरून संपूर्ण राज्यात एकाच जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं, या निर्णयाचे स्वागत विधान भावनात देखील करण्यात आले. त्यावेळी, भारतीय जनता पक्ष – शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनेच्या या आनंद व्यक्त करण्यावरून सचिन सावंत यांनी शिवसेनेला टोला लगावला. यात मुका मोर्चा म्हणणारे देखील सामील का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला. मराठा आरक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा शिवसेनच्या मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मूक मोर्चा म्हणून उल्लेख करण्यात आला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं