महानगरपालिकेच्या व नगरसेवकांच्या चुकांसाठी मोदींना दोष देऊ नका: मनसे नेते अनिल शिदोरे

पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या घोषणांना अक्षरशः उघड पाडल होत. भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचे देशात प्रखर विरोधक म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहण्यास सुरवात झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी उठसूट नरेंद्र मोदींना दोष देऊ नका अस वक्तव्य केल आहे.
अनिल शिदोरे यांनी पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवत पावसाळ्यातील काम नगरसेवकांकडून करून घ्या अस आवाहन पुणेकरांना केलं आहे. तुरळक पावसानं पुण्यात पाणी साठलंय, वहातूक तुंबली आहे. याची जबाबदारी महानगरपालिकेची आणि नगरसेवकांची आहे. त्यांच्याकडून कामं करून घ्या, उठसूट मोदींना दोष देऊ नका, ते याला जबाबदार नाहीत. त्यांच्या नावावर निवडून आलेले जबाबदार आहेत. अस ट्विट अनिल शिदोरे यांनी केल आहे. दरम्यान त्यांनी हा त्रागा व्यक्त करताना जे या घटनेला जवाबदार आहेत त्यांनाच दोषी धरावे आणि कोणताही संबंध नसताना त्या विषयाला अनुसरून मोदींना दोष देऊ नये असं म्हटलं आहे.
आत्ताच घरून मार्केट यार्डला जाऊन परत आलो. तुरळक पावसानं पाणी साठलंय, वहातूक तुंबली आहे. ह्याची जबाबदारी महानगरपालिकेची आणि नगरसेवकांची आहे. त्यांच्याकडून कामं करून घ्या, उठसूट मोदींना दोष देऊ नका, ते ह्याला जबाबदार नाहीत.. त्यांच्या नावावर निवडून आलेले जबाबदार आहेत.
— Anil Shidore (@anilshidore) June 28, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं