RVNL Vs Jupiter Wagon Share | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स तेजीत, आता मोठी बातमी आली, फायदा होणार?

RVNL Vs Jupiter Wagon Share | ज्युपिटर वॅगन्स या रेल्वे वॅगन, हाय-स्पीड ब्रेक सिस्टीम आणि रेल्वे अभियांत्रिकी उपकरणे बनवणारी कंपनी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या QIP चे मूल्य 500 कोटी रुपये असेल. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी ज्युपिटर वॅगन्स स्टॉक 1.71 टक्के घसरणीसह 341.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील अनेक कंपन्या भांडवल उभारणीसाठी QIP लाँच करत असतात. यासाठी सेबीच्या मंजुरीची आवश्यकता नसते. कोणतीही कंपनी स्वतः आपल्या शेअरची किंमत ठरवते, जी 2 आठवड्यांच्या सरासरी किमतीपेक्षा कमी नसावी. QIP हा अनेक कंपनीसाठी भांडवल उभारण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या 500 कोटी रुपये मूल्याच्या QIP मध्ये 300 कोटी रुपयेचा बेस इश्यू असेल, जो ओव्हर सबस्क्रिप्शनच्या बाबतीत आणखी 200 कोटीने वाढवता येईल. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या QIP ची सूचक किंमत 315 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमधील किंमतीच्या तुलनेत ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या QIP ची सूचक किंमत 7.12 टक्के कमी आहे. अशा परिस्थितीत, संभाव्य गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक एंट्री पॉइंट उपलब्ध होईल. ज्युपिटर वॅगन्स कंपनीने आपल्या QIP साठी अॅक्सिस कॅपिटल, सिस्टिमॅटिक्स आणि ICICI सिक्युरिटीज यांना बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.
ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 339.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2023 यावर्षात ज्युपिटर वॅगन्स स्टॉकची किंमत 250 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स स्टॉक 290 टक्के मजबूत झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Vs Jupiter Wagon Share NSE 01 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं