असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार

सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
पुढे अजित पवार म्हणाले दरवर्षी मुंबई महानगरपालिका नालेसफाई झाल्याचा दावा करते आणि प्रत्येकवर्षी तो दावा फोल ठरतो. सरकार यावर काहीच खबरदारी घेत नसल्याने माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत. जे आधीच आहे तेच सरकारला आणि महानगरपालिकेला सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.
मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास ६० जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या पावसाळी उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केला.
दरवर्षी @mybmc मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते.सरकारनं खबरदारी न घेतल्यानं किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं मरतात. जे आहे ते सांभाळता येत नसलेले Smart City करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज आहे. सरकारचा बेजबाबदारपणा आहे. #MonsoonSession #MumbaiRain
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) 2 July 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं