Integra Essentia Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 6 रुपयाचा पेनी शेअर मालामाल करतोय, वेळीच एंट्री घ्या

Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह 6.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 285 कोटी रुपये आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6 रुपये होती.
मागील एका महिन्यात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरमध्ये फक्त एक टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 7 मार्च 2022 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 1.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 276 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 0.81 टक्के वाढीसह 6.20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
सैनी दिलेल्या माहितीत इंटेग्रा एसेंशिया कंपनीने कळवले होते की, नुकताच इंटेग्रा एसेंशिया कंपनीला 18 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर प्रीमियम तांदूळ पुरवठ्यासाठी देण्यात आली होती. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 30 कोटी रुपये आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनी ऑर्डर बूकमध्ये सोर्सिंग आणि सप्लाय एक्झिक्यूशन प्लॅननुसार चालू आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर 25 टक्के वाढ साध्य करू शकते. ही कंपनी चालू आर्थिक वर्षापूर्वीच आपले महसूल लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 248 टक्क्यांची वाढ साध्य केली होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 66.89 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 57.012 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो वार्षिक आधारे 17.11 टक्क्यांनी वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत या कंपनीचा EBITDA मागील आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीच्या 2.11 कोटी रुपयेच्या तुलनेत 421 टक्के वाढून 10.5 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
इंटेग्रा एसेंशिया या स्मॉल कॅप कंपनीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने गुंतवणूक केली आहे. एलआयसीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 48.59 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. एलआयसीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये 5 रुपये किमतीवर गुंतवणूक केली होती. मागील 3 वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 39 पैशांच्या नीचांक किंमत पातळीपासून 2000 टक्क्यांनी वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Integra Essentia Share Price NSE 07 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं