खळखट्याक: शेतकऱ्यांना लुटणाऱ्या बँक अधिकाऱ्याला चोप; मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकरांना अटक

वाणी : ग्रामीण भागातील सामान्य जनतेला एका योजनेअंतर्गत प्रलोभनं दाखवून सहारा बँकेने अनेकांकडून डिपॉझीटच्या नावाने भरगोस रक्कम जमा केली. दरम्यान, मुदत संपून देखील सदर बँकेने संबंधित ठेवीदारांच्या बँक अकाऊंवर कोणतीही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि उपाध्यक्ष राजू उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर राजू उंबरकर यांचं एक शिष्टमंडळ सहारा बँकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलं आणि त्यानंतर काही ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळावी होती. मात्र काही दिवसांनी त्यांनी बँकेने पुन्हा तोच कित्ता गिरवत उरलेल्या अनेक ठेवीदारांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पुन्हा विषय राजू उंबरकर यांच्याकडे गेल्यावर त्यांनी पुन्हा बँकेत धडक दिली. मात्र त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी संतापजनक उत्तर दिली आणि पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही न्यायालयाच्या निर्णयामुळे उर्वरित ठेवीदारांची रक्कम देऊ शकत नाही असं सांगितलं. त्यामुळे राजू उंबरकर यांनी न्यायालयाच्या त्या निर्णयाची प्रत दाखवा आम्ही त्याचा मान राखू, मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी ते दाखवण्यास टाळाटाळ केली आणि त्यातून ते खोटं सांगत असल्याचा सिद्ध झालं.
त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले आणि काही वेळाने बाचाबाची टोकाला गेल्याने अधिकाऱ्याला चोप देण्यात आला. दरम्यान संबंधित प्रकाराची बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केल्यावर मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना अटक झाली आहे. मात्र सामान्य लोकांचे आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून फसव्या योजनेच्या माध्यमातून पैसे उकळणारे बँक अधिकारी मात्र मोकाटच आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं