BEL Share Price | 22 पैशांच्या शेअरची जादू, गुंतवणूकदार श्रीमंत झाले, आता शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजी नोंदवली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 188.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 186.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.37 लाख कोटी रुपये आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 121 रुपये किमतीवरून वाढून 187 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 30 जानेवारी 2023 रोजी 88 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअर्सची किंमत 120 टक्क्यांनी वाढली आहे. 8 मे 2020 रोजी कोरोना काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या नीचांक किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 830 टक्के वाढले आहेत.
1 जानेवारी 1999 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 22 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअर सध्या 84832 टक्क्यांनी वाढला आहे. अनेक दिग्गज ब्रोकरेज फर्मनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 208 रुपये ते 210 रुपये टारगेट प्राइस देखील निश्चित केली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने सेबी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला भारतीय लष्कराने 4522 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला विविध कॅलिबर्सच्या फ्यूजचा पुरवठा करायचा आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारतीय लष्कर यांच्यात हा करार झाला होता. भारतीय लष्कराने दिलेल्या ऑर्डरमध्ये स्वदेशी क्रिटिकल तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की कंपनी हे उत्पादन इंडियन इलेक्ट्रॉनिक्स आणि असोसिएटेड इंडस्ट्रीज या कंपनीकडून खरेदी करते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने उत्पादित केलेले उपकरण आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत बनवले जातात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEL Share Price NSE Live 06 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं