Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत सकारात्मक बातम्यांचा ओघ, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पार गेली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 105.10 अब्ज डॉलरवर गेली आहे. मुकेश अंबानी आता जगात श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहचले आहे.
श्रीमंतांच्या यादीतून पूर्वी सर्वात खाली घसरलेले गौतम अदानी आता 16 व्या क्रमांकावर आले आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 79.4 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के मजबूत झाले आहेत. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 2,740.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजारमूल्य 93,121.64 कोटी रुपये वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मौल्यवान कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 2,718.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2,724.95 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होत.
मागील दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 5.33 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार मुल्य 18,39,183.64 कोटी रुपयेवर पोहचले आहे.
मागील काही दिवसात फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे नाही टीव्ही नेटवर्क-18 कंपनीचे शेअर्स देखील एका आठवड्यात 45 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. त्याच वेळी टीव्ही-18 ब्रॉडकास्ट कंपनीचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 24 टक्के वाढले होते. ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली आहे.
यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 2885 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने देखील या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 3050 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 13 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं