Federal Bank Share Price | झुनझुनवाला कुटुंबीयांचा खास शेअर! मल्टिबॅगर फेडरल बँके शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Federal Bank Share Price | फेडरल बँकेने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यात सुमारे 25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. अनेक तज्ञ या बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने फेडरल बँकेच्या टार्गेट प्राइसमध्ये सुधारणा केल्याची अपडेट मिळत आहे.
ब्रोकरेज फर्मने स्वस्त मुल्यांकन आणि कमी जोखीम लक्षात घेऊन फेडरल बँकेच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते फेडरल बँकेचे शेअर्स पुढील काळात 185 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी फेडरल बँक स्टॉक 1.30 टक्के वाढीसह 147.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार फेडरल बँक लवकरच नवीन सीईओची नियुक्ती करणार आहे. कारण विद्यमान सीईओ 24 सप्टेंबर 2026 रोजी निवृत्त होणार आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने माहिती दिली की, फेडरल बँकेतील ठेवींचे मूल्य मागील काही तिमाहींमध्ये अनेक पट वाढले आहे. आणि बँकेच्या कर्ज विभागात देखील सकारात्मक कामगिरी पाहायला मिळाली आहे. म्हणून ब्रोकरेज फर्मने फेडरल बँकेच्या शेअर्सवर 190 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने फेडरल बँक स्टॉकवरील आपली टार्गेट प्राइस अपडेट केली नाहीये. या फर्मच्या तज्ञांनी फेडरल बँकची टारगेट प्राइस 175 रुपये जाहीर केली होती. तर येस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी फेडरल बँक स्टॉकवर 195 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत फेडरल बँकेने निव्वळ नफ्यात 25.3 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा 1006.74 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत फेडरल बँकेने 803.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 1956.5 कोटी रुपयेवरून 8.5 टक्के वाढून 2123.4 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील फेडरल बँक स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे फेडरल बँकेचे 72,713,440 इक्विटी शेअर्स होते. म्हणजेच त्यांनी या बँकेचे 3.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कालच्या स्टॉक किमतीनुसार रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण शेअर्सचे मूल्य 1,090 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Federal Bank Share Price today on 18 January 2024
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं