RVNL Share Price | सरकारी RVNL शेअर तेजीत वाढतोय, 5 दिवसात दिला 15 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस किती?

RVNL Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 234 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी वाढ पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48,750 कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 235 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56 रुपये होती. मागील 5 दिवसात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के वाढीसह 242.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 182 रुपये किमतीवरून वाढून 234 रुपये किमतीवर गेली आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 119 रुपये किंमत पातळीवरून 96 टक्के मजबूत झाले आहेत.
28 फेब्रुवारी 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या किमतीवर ज्या लोकांनी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 300 टक्क्यांनी वाढले आहे.
12 एप्रिल 2019 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 1100 टक्के वाढली आहे. नुकताच मध्य रेल्वे विभागाने रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला 311.17 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
या ऑर्डर अंतर्गत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला चार बोगदे बांधण्याचे, मातीकाम तयार करण्याचे, दोन ब्रीज आणि 25 लहान पुल आणि एका मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याचे, स्टोन ब्लास्टचा पुरवठा, ट्रॅक लिंकिंग, साइड ड्रेन रिटेनिंग वॉल इत्यादी काम देण्यात आले आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी हे काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी, रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाने 419 कोटी रुपये मूल्याचे काम दिले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 18 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं