उर्मिला मातोंडकर काँग्रेसला सोडचिट्ठी देणार; पण भाजप-सेना की मनसेत प्रवेश?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवरून प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मातोंडकर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाल शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान गोपाल शेट्टी यांनी मातोंडकर यांचा दारूण पराभव करत विजय प्राप्त केला होता.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना एक लेखी पत्र देखील पाठवले होते. दरम्यान ते पत्र सार्वजनिक झाले. खासगी पत्र सार्वजनिक झाल्याने मातोंडकर चांगल्याच भडकल्या होत्या. मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना पाठवलेल्या त्या पत्रात आपल्या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमुळेच आपला पराभव झाल्याचं म्हंटले आहे.
दरम्यान मातोंडकर या पक्षातील विश्वासघातामुळे पक्षावर नाराज नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मातोंडकर या दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात अशी शक्यता राजकीय वर्तवल्या जात आहे. विशेष म्हणजे प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहिती नुसार उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मनसेकडून देखील पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. उर्मिला मातोंडकर यांची कारकीर्द ही चित्रपट क्षेत्रातील असताना देखील लोकसभा निवडणुकीतील त्यांनी संवाद साधताना दाखवलेले कौशल्य आणि एखाद्या अनुभवी प्रवक्त्याप्रमाणे विषय मांडण्याची कला पाहून अनेकांच्या भुवयाला उंचावल्या होत्या. त्यामुळेच त्यांना मोठं राजकीय भविष्य आहे हे अधोरेखित झाल्याने महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना आणि मनसे या तिन्ही प्रमुख पक्षांनी फिल्डिंग लावल्याचे समजते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं