कॉर्पोरेट: कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत कंजूसी; अन भाजपाला ९१५.५९ कोटी दान: एडीआर रिपोर्ट

मुंबई: कंपनीच्या वाढीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी दरम्यान आखडता हात घेणारे कोर्पोरेट्स सध्या सत्ताधारी भाजपवर भलतेच मेहेरबान असल्याचं दिसत आहे. कारण सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर कॉर्पोरेट विश्व मोठ्या प्रमाणावर पैसे उधळत असल्याचं एका रिपोर्टमध्ये सिद्ध झालं आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत भारतीय जनता पक्षाला तब्बल ९१५.५९ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देणग्यांची रक्कम दुसरा महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या देणग्यांच्या तब्बल १६ पट असल्याचं समोर आलं आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
२०१६ ते २०१८ या कालावधीत १,७३१ कॉर्पोरेट्सनी भारतीय जनता पक्षाला ९१५.५९ कोटी रुपये देणगी रुपात दिले. २०१७ आणि २०१८ या आर्थिक वर्षांमध्ये देशातील ६ राष्ट्रीय पक्षांना एकूण १०५९.२५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. यातील ९३ टक्के देणग्या कॉर्पोरेट्सकडून आल्या आहेत. यामधील सर्वाधिक रक्कम भारतीय जनता पक्षाला मिळाली. तर देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या राष्ट्रीय काँग्रेसला केवळ ५५.३६ कोटींच्या देणग्या मिळाल्या. सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या पक्षांच्या यादीत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना मिळालेल्या देणग्यांची रक्कम ७ कोटींहून अधिक आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झालं. भारतीय जनता पक्षाने २०१३ मध्येच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केलं. त्याच आर्थिक वर्षापासून भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळू लागल्या. २०१३ ते २०१८ या कालावधीत भारतीय जनता पक्षाला एकूण १,६२१.४० कोटी रुपये इतकी रक्कम कॉर्पोरेट्सकडून देणग्यांच्या स्वरुपात मिळाली. देशातील राष्ट्रीय पक्षांना याच काळात कॉर्पोरेट्सकडून मिळालेल्या देणग्यांचा विचार केल्यास, ही रक्कम ८३.४९ टक्के इतकी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं