Ganesh Housing Share Price | या शेअरने फक्त 3 वर्षात 1971% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 84% परतावा दिला

Ganesh Housing Share Price | गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन या अहमदाबाद स्थित रिअल इस्टेट कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 694.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गणेश हाउसिंग या रियल्टी कंपनीचे शेअर्स मागील 4 दिवसात 54 टक्क्यांनी मजबूत झाले होते. कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले, आणि शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती.
मागील एका महिन्यात गणेश हाउसिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 84 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 261.30 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 2.41 टक्के घसरणीसह 653 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या निव्वळ नफ्यात 376 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीने 181.43 कोटी रुपयेची निव्वळ विक्री केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या निव्वळ विक्रीत 171.4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीने 66.85 कोटी रुपयेची निव्वळ विक्री केली होती. त्याच वेळी, डिसेंबर 2023 तिमाहीत गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीने 100.56 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 376.01 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीने 21.13 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील 3 वर्षात गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1971 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन या रिअल इस्टेट कंपनीचे शेअर्स 32.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गणेश हाउसिंग कंपनीचे शेअर्स 20 जानेवारी 2024 रोजी 694.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे.
गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा बांधकाम व्यवसाय करते. गणेश हाउसिंग कंपनीने जुलै 2016 मध्ये आपल्या पात्र शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन कंपनीने आपल्या शेअरधारकांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ganesh Housing Share Price NSE Live 23 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं