Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, नवीन टार्गेट प्राईस जाहीर

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने 19 जानेवारी 2024 रोजी टिनप्लेट कंपनी ऑफ इंडियाच्या पात्र शेअरधारकांना रेकॉर्ड तारखेपर्यंत 8.65 कोटी शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतला होता. टाटा स्टील आणि टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया यांच्यात 15 जानेवारी 2024 रोजी विलीनीकरणाच्या अंमलबजावणीबाबत सहमती झाली आहे.
सेबी फाइलिंगनुसार या विलीनीकरण योजनेअंतर्गत शेअरधारकांना टाटा स्टील कंपनीचे शेअर्स दिले जातील. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.16 टक्के घसरणीसह 131.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा स्टील कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टिनप्लेट कंपनीच्या पात्र शेअरधारकांना 33:10 या प्रमाणात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स वाटप केले जाणार आहेत. TCIL कंपनीच्या गुंतवणुकदारांना त्यांच्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक 10 शेअर्सवर 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले टाटा स्टील कंपनीचे 33 शेअर्स देण्यात येणार आहेत.
शेअर बाजारातील अनेक तज्ञ टाटा स्टील स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 160 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये तत्काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 145 रुपयेवरून वाढवून 160 रुपये केली आहे.
आशियाई फ्लॅट स्टीलच्या किमती मार्च- ऑक्टोबर या कालावधीत 22 टक्क्यांनी घसरल्या आणि मागील दोन महिन्यांत त्यांच्या किमती पुन्हा 8 टक्क्यांनी वाढल्या. जेफरीजने म्हंटले आहे की, टाटा स्टील कंपनीच्या मालमत्तेत होणारी सुधारणा आणि एकूण आशिया खंडांमध्ये स्टील उद्योगात वाढणारा कंपनीचा वाटा सकारात्मक बाब आहे.
ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने गुंतवणुकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअर्सची रेटिंग ‘बाय’ वरून कमी करून ‘लो’ केली आहे. आणि टार्गेट प्राइस 145 रुपये केली आहे. आज टाटा स्टील स्टॉक 131 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Steel Share Price NSE Live 23 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं