Tanla Share Price | जबरदस्त शेअर! 48000 हजार रुपयांवर दिला 1 कोटी रुपये परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tanla Share Price | तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. ज्या लोकांनी एक दशकापूर्वी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्समध्ये 48000 हजार रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटी रुपये झाले आहे.
मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2.5 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 3.74 टक्के घसरणीसह 998.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अनेक ब्रोकरेज फर्म तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांनी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 6 रुपये लाभांश देखील वाटप करणार आहे. लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 5 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे.
31 जानेवारी 2014 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 4.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 1037.35 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज मात्र तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्समध्ये 48 हजार रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी पेक्षा जास्त झाले आहेत. 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 506.10 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका वर्षात तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्समध्ये 160 टक्क्यांची वाढ झाली आहे. 24 जुलै 2023 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 1317.70 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आता मात्र हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरून 21 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या डिसेंबर 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालाचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या महसुलावर आणि शेअर्सच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.
तज्ञांच्या मते, तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स पुढील काळात 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2025-2026 साठी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या महसुलात आठ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यासह EPS मध्ये देखील नऊ टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 1350 रुपये निश्चित केली असून, स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tanla Share Price NSE Live 29 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं