Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्स तुफान तेजीत येणार, तज्ज्ञांकडून पूढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 886.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञही या कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा मोटर्स कंपनीने मारुती सुझुकी सारख्या दिग्गज कंपनीला देखील मागे टाकले आहे. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.68 टक्के वाढीसह 881.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा मोटर्स कंपनीने तब्बल 7 वर्षांनंतर मारुती सुझुकी सारख्या कंपनीला मार्केट कॅपच्या बाबतीत मागे टाकून भारतातील सर्वात मूल्यवान वाहन निर्माता कंपनी म्हणून किर्तीमान प्राप्त केला आहे. मात्र मागील ट्रेडिंग सेशनच्या शेवटी मारुती सुझुकी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,13,248.72 कोटी रुपये होते. आणि टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,85,515.64 कोटी रुपये होते. टाटा मोटर्स कंपनी 2 फेब्रुवारी रोजी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स लवकरच 900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मॉर्गन स्टॅनले आणि मोतीलाल ओसवाल यांसारख्या दिग्गज ब्रोकरेज फर्मने देखील टाटा मोटर्स स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांची उपकंपनी असलेल्या जग्वार लँड रोव्हर कंपनीने विक्रमी विक्री साध्य केली आहे. आणि प्रवासी वाहनांच्या किमतीत झालेल्या वाढीचा फायदा देखील टाटा मोटर्स कंपनीला मिळाला आहे.
मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्क्यांनी वाढली आहे. नुकताच टाटा मोटर्स कंपनीने 1 फेब्रुवारी 2024 पासून आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीमध्ये 0.7 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. या किंमत वाढीचा परिणाम कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर देखील होणार आहे.
याव्यतिरिक्त, टाटा मोटर्स कंपनीच्या जग्वार लँड रोव्हर विभागाने डिसेंबर 2023 तिमाहीत 1.01 लाख घाऊक युनिट्सची विक्री साध्य केली आहे. या विक्रीत वार्षिक आधारावर 27 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील 11 तिमाहीत कंपनीने साध्य केलेला हा सर्वाधिक घाऊक विक्रीचा आकडा आहे.
टाटा मोटर्स कंपनी एप्रिल 2024 पासून फोर्ड इंडियाकडून विकत घेतलेल्या साणंद प्लांटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सुरू करणार आहे. फोर्ड कंपनीचे वाहन उत्पादन युनिट टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीने जानेवारी 2022 मध्ये 725.7 कोटी रुपयेला खरेदी केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE Live 31 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं