Trent Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मजबूत तेजीत, 2 दिवसात 19% परतावा दिला, आता सरकारात्मक बातमीने पुन्हा तेजी?

Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. ट्रेंट लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत दुप्पट नफा कमावला आहे. डिसेंबर तिमाहीत ट्रेंट लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुप्पट वाढून 370.64 कोटी रुपयेवर पोहोचला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ट्रेंट लिमिटेड कंपनीने 154.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के घसरणीसह 3,752 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ट्रेंट लिमिटेड कंपनीने आपल्या निकालात माहिती दिली की, विक्री आणि मार्जिनमध्ये सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ नोंदवली गेली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स 19.7 टक्के वाढीसह 3635 रुपये किमतीवर पोहचले होते. ट्रेंट लिमिटेड ही कंपनी वेस्टसाइड, ज्युडिओ आणि स्टार या ब्रँड नावाने रिटेल स्टोअर्स चालवते.
या कंपनीने डिसेंबर तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 50.5 टक्के वाढीसह 3,466.62 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2,303.38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर तिमाहीत ट्रेंट कंपनीचा एकूण खर्च मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 41.64 टक्क्यांच्या वाढीसह 3,101.44 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने निवेदन जाहीर केले की, “ट्रेंट लिमिटेड कंपनीने सर्व फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत ट्रेंट कंपनीने आपल्या महसूल संकलनात 50 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे”.
ट्रेंट लिमिटेड कंपनीने तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 19 टक्क्यांनी वाढली होती. याआधी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 3031.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,28,304.31 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Trent Share Price NSE Live 09 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं