शिवसेनेची नाटकं राज्यातील शेतकऱ्यांना समजली आहेत; ते फसणार नाहीत: राजू शेट्टी

मुंबई : मागील काही दिवसांपासून आणि विधानसभा तोंडावर येताच शिवसेना पक्ष पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाला आहे. त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शिवसेना पीक विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असलेलं पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडून शिवसेनेच्या या भूमिकेवर बोचऱ्या शब्दात टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच विषयाला अनुसरून स्वभिमानीचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
या विषयी बोलताना राजू शेट्टी यांनी ‘विमा कंपन्यांबाबत उद्धव ठाकरे यांना अचानक जाग आली असून विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याआधी शिवसेनेने सरकारने विमा कंपनीशी काय करार केला आहे हे तपासावे. तो करार कोणत्या पद्धतीने का झाला याचा जाब मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावा आणि मग मोर्चा काढण्याची भाषा करावी अस शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावले आहेत.
दरम्यान पुढे बोलताना शेट्टी यांनी ‘एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो ही नाटक करायची ही शिवसेनेची नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहेत. आता शेतकरी फसणार नाही अस विधान करत शिवसेनेवर निशाणा साधला. त्यामुळे बुधवारी नेमकं कर घडणार आणि विरोधक शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांनी कसं लक्ष करणार ते पाहावं लागणार आहे. त्यात सरकार मध्ये असून देखील आंदोलन करण्याची वेळ शिवसेनेवर येत असल्याने ते किती कामचुकार आहेत याचाच पुरावा असल्याचं राजकीय विरोधकांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं