IRFC Share Price | IRFC आणि RVNL शेअर्समध्ये जोरदार तेजी येणार, फायद्याची अपडेट आली

IRFC Share Price | केंद्र सरकारने भारताच्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून नवनवीन उपक्रम सुरू केले आहे. सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतातील 2000 विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे उद्घाटन केले आहे.
या सर्व प्रकल्पांचे एकूण मूल्य 41,000 कोटी रुपये आहे. मागील काही वर्षापासून भारत सरकारने रेल्वे क्षेत्रातील विकासावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने रेल्वे कंपन्याना याचा खूप फायदा झाला आहे. मागील काही वर्षात रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील 553 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच लवकरच भारतातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 553 रेल्वे स्टेशन सुशोभित होणार आहेत. या सर्व प्रकल्पाचे एकूण मुल्य 19,000 कोटी रुपये आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 विविध राज्यातील 1500 रोड ओव्हरब्रिज आणि अंडरपासचे उद्घाटन करणार असून त्याचे एकूण मुल्य 21,520 कोटी रुपये आहे.
रेल विकास निगम :
आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.20 टक्के वाढीसह 275.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
IRFC :
आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.13 टक्के वाढीसह 155.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रेल्वे क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांना वित्त पुरवठा करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत दुप्पट झाले होते. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात.
रेलटेल :
आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.68 टक्के वाढीसह 454.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या रेल्वे स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. ही कंपनी रेल्वे क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचा व्यावग करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRFC Share Price NSE Live 27 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं