NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! एनबीसीसी शेअर्स बुलेट तेजीत येणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 135.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( एनबीसीसी इंडिया अंश )
नुकताच एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एचएससीसी इंडिया लिमिटेड कंपनीला कोल्हापुरमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी 459.7 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. हा कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 133.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, एचएससीसी इंडिया लिमिटेड या त्यांच्या उपकंपनीला महाराष्ट्र सरकारकडून 600 खाटांचे जनरल हॉस्पिटल, 250 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल, 250 खाटांचे कोल्हापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे.
या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 459.7 कोटी रुपये आहे. एचएससीसी इंडिया लिमिटेड कंपनीने 28 फेब्रुवारी रोजी IFCI लिमिटेड कंपनीसोबत 150 कोटी रुपये मूल्याचा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केला आहे.
एचएससीसी इंडिया लिमिटेड या सरकारी मालकीच्या बांधकाम कंपनीने गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी माहिती दिली की, त्यांनी 273 कोटी रुपये मूल्याचे नवी दिल्लीस्थित 61,000 चौरस फूट व्यावसायिक बिल्ट-अप क्षेत्राचा ई-लिलाव यशस्वीपणे पार पाडला आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीने मेसर्स ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया, ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने या लिलावात भाग घेऊन हा लिलाव जिंकला.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | NBCC Share Price NSE Live 01 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं