Subex Share Price | 36 रुपयाचा शेअर नशीब बदलेल, AI क्षेत्रासंबंधित कंपनीचा शेअर बक्कळ कमाई करून देईल

Subex Share Price | सुबेक्स या AI आणि IT संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर गुरूवारी बंपर तेजीत वाढत होते. गुरूवारी सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. नुकताच सुबेक्स कंपनीने दक्षिणपूर्व आशियातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीकडून 2.2 दशलक्ष डॉलर्स मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट जिंकल्याची माहिती दिली आहे. ( सुबेक्स कंपनी अंश )
या करारामध्ये सुबेक्स कंपनी AI आधारित हायपरसेन्सवरील फसवणूक व्यवस्थापन संबंधित सेवा प्रदान करणार आहे. या कराराची मुदत पाच वर्ष असेल. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी सुबेक्स कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 36.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात सुबेक्स कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर शेअर पुन्हा खाली आला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,070.42 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पहायला मिळाली होती. यावर्षी हा स्टॉक आतपर्यंत 6 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील एका वर्षभरात सुबेक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
28 मार्च 2023 रोजी सुबेक्स कंपनीचे शेअर्स 25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 45.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सुबेक्स स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 0.6 आहे, जो कमी अस्थिरता दर्शवतो. सुबेक्स कंपनीच्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 44.6 अंकावर असून तो ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही याचे निदर्शक आहे.
सुबेक्स कंपनीच्या सीईओने एका निवेदनात म्हंटले की, “एपीएसीमधील एका आघाडीच्या ऑपरेटरसोबत काम करण्याची मोठी संधी सुबेक्स कंपनीला मिळाली आहे. आमचे AI टेक्नॉलॉजीवर आधारित फसवणूक व्यवस्थापन विविध व्यवसाय आणि दूरसंचार सिस्टीम ऑपरेटर्ससाठी सर्वोत्तम जोखीम व्यवस्थापन उपाय प्रदान करतील”. सुबेक्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः जागतिक दूरसंचार प्रदात्याना विविध आयटी आणि AI सेवा प्रदान कण्याचा व्यवसाय करते.
या कंपनीचे ऑपरेशन्स आणि बिझनेस सपोर्ट सिस्टम्स जगभरात विस्तारले आहेत. कंपनीचा व्यवसाय उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅनडा, युरोप, मध्य पूर्व, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यासारख्या देशात विस्तारला आहे. सुबेक्स कंपनी आपल्या ग्राहकांना हायपरसेन्स, फ्रॉड मॅनेजमेंट, बिझनेस ॲश्युरन्स, कॅपेसिटी मॅनेजमेंट, पार्टनर इकोसिस्टम मॅनेजमेंट, ॲनालिटिक्स सेंटर ऑफ ट्रस्ट, IDCentral आणि सेक्शन यासारख्या सेवा प्रदान करण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Subex Share Price today on 8 March 2024
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं