5G मुळे मेंदूचा कर्करोग, नपुंसकत्व व अल्झायमर असे भयंकर विकार होण्याची भीती: रशियन टाईम्स

मॉस्को : भारतासह जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये आता 5G च्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. कारण त्यामुळे करोडो उपभोक्ते काही क्षणांत काही जीबी डेटा जलदगतीने डाऊनलोड करू शकतील. दरम्यान सध्या जगभरात मोबाईल कंपन्यांसोबत ऑटोमोबाईल कंपन्यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतात तर इंटरनेटवाली कारही लाँच झाली आहे. दक्षिण कोरियामध्येतर 5Gचा वापर देखील वापर सुरू झाला आहे. तर चीनमध्ये परवानगी मिळाली आहे.
5 जी तंत्रज्ञानामुळे काही सेकंदांमध्ये मोठमोठ्या फाईल डाऊनलोड होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, 5 G तंत्रज्ञानामुळे प्राण्यांसह लोकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होण्याची दाट भीती व्यक्त करण्यात येते आहे. या नेटवर्कमुळे कॅन्सर सारखा भयानक आजार किंवा नपुसंकत्व येण्याची मोठी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान किती धोके निर्माण करणार आहेत यावर अनेकांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.
रशियन टाईम्सच्या चॅनलने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात 5G मुळे मनुष्य तसेच प्राण्यांच्या एकूण जीवनालाच मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. या चॅनलमध्ये आलेल्या तज्ज्ञांनी 5G नेटवर्क देशासाठी देखील धोक्याची घंटा आहे. या नेटवर्कमुळे लोकांच्या आरोग्यवर अत्यंत घातक आणि दूरगामी दुष्परिणाम होणार आहेत. यातील रेडिएशनमुळे मेंदूचा कर्करोग, नपुंसकत्व आणि अल्झायमर या सारखे भयंकर विकार होण्याची भीती यामध्ये व्यक्त केली आहे. परंतु, वैज्ञानिकांनी चॅनलच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नसून चॅनलनेही याबाबत काही पुरावे दिलेले नाहीत.
सर्व मोबाईलमध्ये विद्युत चुंबकीय लहरींचा वापर केला जातो. या लहरींबाबत विविध देशांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. काही तज्ज्ञांच्या मते 5G मुळे कॅन्सर होऊ शकतो. तर २०१४ मध्ये डब्ल्यूएचओने सांगितले होते की, मोबाईल फोनमुळे कोणताही धोका नाही. परंतु, याच डब्ल्यूएचओने आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC) च्या हवाल्याने सांगिले आहे की रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका असल्याचे म्हटले होते. मोबाईमध्येही हीच फ्रिक्वेन्सी वापरली जाते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं