Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स पुन्हा मजबूत तेजीत, बँकेकडून मोठी अपडेट आली, शेअरला पुढेही फायदा होणार?

Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये काही दिवसापासून सुधारणा पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 23.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. येस बँकने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांनी कर्जदार कंपनी काटेर्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कर्ज प्रुडंट एआरसी कंपनीकडे हस्तांतरित केले आहे. ( येस बँक अंश )
प्रुडंट कंपनी मालमत्ता पुनर्रचना संबंधित व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे. यासाठी येस बँकेला 203 कोटी रुपये मिळाले आहे. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.74 टक्के वाढीसह 23.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
काटेर्रा इंडिया या कंपनीने मागील वर्षी कॉर्पोरेट दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीने येस बँकेकडून 521 कोटी रुपये कर्ज घेतले होते. याचा अर्थ लेटेस्ट अपडेटनुसार येस बँकेला काटेर्रा इंडिया कंपनीच्या कर्जातून फक्त 40 टक्के रक्कम परत मिळाली आहे.
अमेरिकेतील काटेर्रा कंपनीची भारतीय युनिट म्हणून काटेर्रा इंडिया कंपनी व्यावसाय करते. यूएस आणि केमन आयलंडच्या अनेक संस्थांनी 2021 या वर्षात चॅप्टर 11 अंतर्गत दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केले होते. त्याचवेळी काटेर्रा इंडिया कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती.
काटेर्रा इंडिया कंपनीच्या व्यावसायिक पोर्टफोलिओमध्ये भारतातील विविध राज्यांमधील रुग्णालये, बिझनेस पार्क, मॉल्स, हॉटेल्स सामील आहेत. येस बँकेचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.7 टक्के घसरणीसह 23.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बुधवारी या बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 23.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात येस बँक स्टॉक 50 टक्के वाढला आहे. मात्र मागील पाच वर्षांत या बँकेच्या शेअर्सची किंमत 90 टक्के घसरली आहे. पाच वर्षांपूर्वी येस बँकेचे शेअर्स 252 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Yes Bank Share Price NSE Live 21 march 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं