L&T Share Price | भरवशाच्या L&T शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, कंपनीबाबतच्या अपडेटनंतर टार्गेट प्राईस जाहीर

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीची उपकंपनी असलेल्या एल अँड टी इनोवेशन चेन्नई लिमिटेड आणि एल अँड टी सीवूड लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लार्सन अँड टुब्रो कंपनीचे तेजीत आले आहे. मागील वर्षी जुलै 2023 मध्ये कंपनीने विलिनिकरणाचा प्रस्ताव मंजूर केला होता. तर आता NCLT ने देखील कंपनीला विलीनीकरणाची परवानगी दिली आहे. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के वाढीसह 3,610 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
लार्सन अँड टुब्रो कंपनीने आपल्या एका निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनीने आपल्या LTICCL आणि LTSL या दोन्ही उपकंपन्याचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणामुळे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या कामकाजात सुधारणा पाहायला मिळेल. या निर्णयामुळे कंपनीच्या खर्चात देखील कपात होणार आहे. तसेच कंपनीचे संपूर्ण ऑपरेशन अधिक चांगल्या पद्धतीने चालविण्यास मदत होईल.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञानी लार्सन अँड टुब्रो स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 4071 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 20 टक्क्यांनी वाढू शकतात.
हायड्रोकार्बन्समध्ये होणारी मोठी वाढ, सौदी अरेबियासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारातून नविकरणक्षम ऊर्जा साधनांची पूर्तता आणि देशांतर्गत खाजगी भांडवली खर्चात होणारी अपेक्षित वाढ यामुळे लार्सन अँड टुब्रो स्टॉक दीर्घकाळात चांगला फायदा देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| L&T Share Price NSE Live 23 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं