Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स बुधवारी तेजीत वाढत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच गोल्डमन सॅक्सने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन 4495 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
गोल्डमन सॅक्स फर्मच्या मते, विविध सकारात्मक संकेत आणि डिस्ने सोबत जॉइंट वेंचर करण्याबाबत अनुकूल परिस्थिती हे घटक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील तेजी वाढवू शकतात. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.054 टक्के वाढीसह 2,987.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गोल्डमन सॅक्स फर्मच्या तज्ञांनी, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेल आणि जिओ टेलिकॉम या दोन व्यवसायांमध्ये भांडवली खर्चाचे प्रमाण उच्चांक पाळतीवर पोहोचल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे.
ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 4,495 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2995 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 मार्च 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3,024.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने मागील दहा वर्षात आपल्या विविध व्यवसायात 125 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. या कंपनीने मुख्यतः हायड्रोकार्बन्स आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भविष्यात या दोन्ही सेक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गोल्डमन सॅक्सच्या मते, आर्थिक वर्ष 2024-27 मध्ये रिलायन्स रिटेल कंपनीचा EBITDA आणि महसूल कमाई जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे. कंपनीचा एकत्रित EBITDA आर्थिक वर्ष 2023 मध्ये 12.4 टक्क्यांनी वाढून 2027 पर्यंत 14.3 टक्क्यांवर जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 28 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं