Yes Bank Share Price | येस बँक शेअर टेक्निकल चार्ट काय सांगतोय? तज्ज्ञांकडून 'अंडरवेट रेटिंग', काय परिणाम होणार?

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. काही ब्रोकरेज फर्मने येस बँक स्टॉकवर नकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या काही ब्रोकरेज कंपन्यांनी येस बँकेच्या शेअर्सची टार्गेट प्राईस कमी केली आहे. मार्च 2024 तिमाहीत चांगला निकाल देऊनही येस बँकेच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी येस बँक स्टॉकवर अंडरवेट रेटिंग दिली आहे. ( येस बँक अंश )
तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स 16.50 रुपये किमतीवर जाऊ शकतात. 4 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 25.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञाच्या मते, या बँकेचे शेअर्स पुढील काळात 16.50 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 25.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली होती. याकाळात बँकेच्या गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या माध्यमातून 46.80 टक्के नफा कमावला होता. ब्रोकरेज फर्म नोमुराने येस बँकेच्या शेअर्सवर न्युट्रल रेटिंग दिली आहे. 3 एप्रिल रोजी येस बँकेने आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत येस बँकेच्या कर्ज वाटपात 5 टक्के सुधारणा पाहायला मिळाली आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचे लोन्स अँड अॅडव्हान्स 2.28 लाख कोटी रुपये नोंदवले होते. जे मागील वर्षी याच तिमाहीत 2 लाख कोटी रुपये होते.
येस बँकेच्या ठेवीमध्ये तिमाही आधारावर 10 टक्के आणि वार्षिक आधारावर 22.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेकडे 2.66 लाख कोटी रुपयेच्या ठेवी होत्या. बँकेचे CASA प्रमाण वार्षिक आधारावर 23 टक्क्यांच्या वाढीसह 82,315 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हे प्रमाण 66,903 कोटी रुपये होते. मार्च तिमाहीत येस बँकेच्या मुदत ठेवींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र अनेक ब्रोकरेज फर्मचे तज्ञ स्टॉक खरेदीबाबत उत्सुक दिसत नाहीये.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Yes Bank Share Price NSE Live 05 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं