तक्रारी होत्या खरीप विमा कंपनीच्या; उद्धव ठाकरेंचा मोर्चा 'रब्बी' विमा कंपनीवर

मुंबई : मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
याच पीक कंपन्यांची कार्यालयं मुंबईमध्ये पहिल्यापासून असून देखील शिवसेनेला नेमका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा पुळका आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला. बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून मोर्चाला सुरुवात झाली होती जो थेट विमा कंपन्यांवर हा मोर्चा धडकला. उद्धव ठाकरे यांनी साबंधित ठिकाणी जाहीर सभाही घेतली. मात्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं हसू होईल अशी एक घटना घडली आहे. मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या खाजगी विमा कंपनीवर मोर्चा काढला आणि १५ दिवसात पैसे न दिल्यास शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता.
दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तक्रारी या खरीप विमा कंपनीच्या बाबतीत होत्या. करणं पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. मात्र शिवसेनेने ज्या कंपनीवर धडक मोर्चा घेऊन जाण्याचं नाटक केलं ती कंपनी केवळ ‘रब्बी हंगामासाठी’च भरपाई देते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वाखाली त्यांना दम देऊन आले, ज्यांचा खरीप पिकाच्या भरपाईशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शिवसेनेने मोर्चा काढण्यापूर्वी किती अभ्यास केला होता त्याचा प्रत्यय आला आहे. तसेच शिवसेना नैर्तृत्वाला शेतीमधील काहीच कळत नसल्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.
दरम्यान ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ ही कंपनी रब्बी हंगामातील भरपाई देणारी विमा कंपनी असल्याने यंदाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत या कंपनीचा केंद्र सरकारकडून समावेशच करण्यात आला नव्हता. त्यामुळे शिवसेनेला मूळ विषय माहित नसताना केवळ शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे भासवण्यासाठीच हा दिखावा मोर्चा काढण्यात आल्याची चर्चा रंगली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं