Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?

Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपन्याच्या शेअर्समध्ये GQG पार्टनर कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. GQG Partners कंपनीने मार्च 2024 तिमाहीत अदानी ग्रुपचा भाग असलेल्या सहा कंपन्यांमध्ये 8,300 कोटी रुपये गुंतवणूक वाढवली आहे. ( अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी अंश )
GQG पार्टनर कंपनीने अदानी समुहाच्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड सेझ, अदानी पॉवर लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट लिमिटेड या सहा कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 3,045 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
GQG पार्टनर कंपनीने मार्च 2024 तिमाहीत अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 2,316 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. यासह अदानी पॉवर कंपनीमध्ये 2138 कोटी रुपये आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीमध्ये 1555 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. GQG पार्टनर कंपनीने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीमध्ये 1,369 कोटी रुपये आणि अदानी पोर्ट्स कंपनीमध्ये 886.10 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. GQG पार्टनर कंपनीने अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये 33 कोटी रुपयेची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे.
GQG कंपनीने अदानी एनर्जी कंपनीचे 4.53 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे 3.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. GQG पार्टनर कंपनीने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे 4.16 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर अदानी पोर्ट कंपनीमध्ये 4.07 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. GQG पार्टनर कंपनीने अदानी पॉवर कंपनीचे 5.2 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये GQG पार्टनर कंपनीचा वाटा 1.9 टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 19 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं