अमेरिकेने ड्रोन पाडल्याने इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त; तणाव वाढला

इराण : इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दरम्यान परिस्थिती चिघळल्यास त्याचे थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील होतील असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होरमुज खाडीक्षेत्रामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती स्थानिक प्रसार माध्यमांना दिली आहे.
इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डनी ही कारवाई केली. युकेचा राष्ट्रीय झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि ४ जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले. यानंतर या जहाजावर ताबा घेण्यात आला. या टँकरमध्ये एकूण २३ कर्मचारी असून यामध्ये भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे, असे इंग्लंडने प्रसिध्दी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारतासाठी देखील चिंतेचा विषय बनला आहे.
इराणच्या गार्डनी त्यांच्या वेबसाईटवर देखील ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या माहितीनुसार, या जहाजाला आंतरराष्ट्रीय जलमार्ग कायदे न पाळल्याने जप्त करण्यात आले आहे. या जहाजाला इराणच्या बंदरावर ठेवले जाणार आहे. इंग्लंडचे सरकार किंवा जहाजाच्या कंपनीचा अद्याप जहाजाशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान इंग्लंड सरकारने हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले असून इराणला थेट इशारा देखील दिला आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांनी सांगितले की, इराणने जर लवकरात लवकर जहाज सोडले नाही तर याचे अत्यंत गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील. आमचे राजदूत इराणसोबत संपर्कात आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं