Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?

Mazagon Dock Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित घसरण पहायला मिळाली होती. शुक्रवारच्या व्यवहारात माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 2.89 टक्के वाढीसह 2525 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात आले. ( माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )
ट्रेडिंग सेशन दरम्यान माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने प्रथमच 2,500 रुपयेचा टप्पा ओलांडला होता. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 1.54 टक्के घसरणीसह 2,418 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,836 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 232.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचा स्टॉक 8.19 टक्के वाढला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 685 टक्के परतावा कमावून दिला आहे.
माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सचा एक वर्षाचा बीटा 0.3 असून तो खूपच कमी अस्थिरता दर्शवतो. या स्टॉकचा RSI 71.4 अंकावर आहे. कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.
निर्मल बंग सिक्युरीटी फर्मच्या तज्ञांनी माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकवर 2,786 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 2,774 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तर Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 2524 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर हा स्टॉक 2284 रुपये सपोर्ट किमतीच्या खाली आला तर शेअर 1991 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी मुख्यतः जहाज बांधणी आणि ऑफशोअर फॅब्रिकेशन यार्ड बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि ऑफशोअर स्ट्रक्चर्सची निर्मिती संबंधित कामे देखील करते. माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी युद्धनौका, व्यापारी जहाजे, पाणबुड्या, सपोर्ट व्हेसल्स, ऑफशोअर प्लॅटफॉर्म, प्रवासी व मालवाहू जहाजे, ट्रॉलर, मुख्य आणि हेलीडेक्स आणि बार्जेस बनवण्याचा व्यावायात गुंतलेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mazagon Dock Share Price NSE Live 27 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं