7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा वाढ केली जाते. यावर्षी एकदा महागाई भत्त्यात (डीए वाढीत) 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता जुलै 2024 रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे. आपला डीए किती वाढणार याबाबत कर्मचारी संभ्रमात आहेत. महागाई भत्त्याबाबत संभ्रम का आहे, हे या लेखात जाणून घेऊया.
केंद्रीय कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या महागाई भत्त्यात (डीए) सरकारने वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ झाली आहे. सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली आहे. त्यानंतर महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे.
महागाई भत्ता वाढीनंतरही कर्मचारी संभ्रमात आहेत. वास्तविक, सरकारने अद्याप महागाई भत्त्याची आकडेवारी अद्ययावत केलेली नाही. महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला की तो शून्य (०) पर्यंत कमी करण्याचा नियम आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या वेळी हा नियम करण्यात आला होता. आता हा नियम लागू झाला आहे की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर डीए शून्य होईल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, लेबर ब्युरोने अद्याप एआयसीपीआय निर्देशांकातील आकडेवारी जाहीर केलेली नाही. महागाई भत्त्याची मोजणीची आकडेवारी 28 मार्च 2024 रोजी जाहीर व्हायला हवी होती, मात्र अद्याप ही आकडेवारी जाहीर न झाल्याने दोन परिस्थिती निर्माण होत आहेत.
लेबर ब्युरोने महागाई भत्त्याचे गणित बदलले आहे, असे अनेकजण गृहित धरत आहेत, तर काहींचे असे मत आहे की, या महागाई भत्त्यांची गणना जुन्या पद्धतीप्रमाणेच होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : 7th Pay Commission Updates check details 28 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं