मुख्यमंत्री म्हणतात ती मतं फक्त मोदींमुळे; तर चंद्रकांत पाटील म्हणतात बुथप्रमुख व पन्नाप्रमुखांमुळे

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि पक्षासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठक सुरु आहेत.
लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले म्हणून समाधान मानू नका. ते मताधिक्य तुम्हाला नाही, मोदींना दिले आहे. ५ वर्षातील कामाचे मूल्यमापन करूनच विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
दरम्यान याच विषयाला अनुसरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या दाव्याला फाटा देत दुसरीच आणि उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचा विजय हा ईव्हीएम किंवा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीमुळे झाला नाही. भारतीय जनता पक्षाच्या बुथप्रमुख, पन्नाप्रमुखांचे सशक्त संघटन आणि पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकास कामांमुळे हा विजय मिळाला आहे. त्याच जोरावर आगामी विधानसभा देखील जिंकू असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच ईव्हीएममुळे विजय झाला असेल, तर बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे कशा जिंकल्या, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात पक्षाच्या विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत पाटील बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुका युती म्हणून लढल्या जाणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, वातावरण चांगले आहे, स्वबळावर जिंकता येईल असे भारतीय जनता पक्षातील मधील अनेक जण म्हणत आहेत, पण मागील निवडणुका काँग्रेस आणि एनसीपी स्वतंत्रपणे लढली होती. आता आघाडीतील पक्षांनी तसा निर्णय घेतल्यास त्यांना २० जागासुद्धा मिळणार नाहीत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती एका विचारांसाठीची आहे. त्यामुळे युती होईल का, मुख्यमंत्री कोण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर सोपवा. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे कमीत कमी २२० जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे. जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील तिथे आणि जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथे देखील भारतीय जनता पक्षात निवडणूक लढणार आहे हे जाणून सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याची सुचना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं