Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत एक अपडेट येत आहे. रिलायन्स कंपनीने पेट्रोकेमिकल्स आणि हायड्रोजन निर्मिती संबंधित व्यवसाय करणारी एक उपकंपनी पूर्णपणे ताब्यात घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीनेने ही उपकंपनी 314.48 कोटी रुपयेला खरेदी केली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
रिलायन्स केमिकल्स अँड मटेरियल्स लिमिटेड ही कंपनी रिलायन्स प्रोजेक्ट्स अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची गुंतवणूक असलेली उपकंपनी आहे. मात्र आता रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने रिलायन्स केमिकल्स अँड मटेरियल्स लिमिटेड कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल 314.48 कोटी रुपयेला खरेदी केले आहे. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.0054 टक्के वाढीसह 2,788.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स कंपनीने सेबीला कळवले आहे की, हा व्यवहार कंपनी आणि तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमधील अंतर्गत व्यवहार आहे. हा खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी कोणत्याही सरकारी किंवा नियामक मंजुरीची गरज नाही. रिलायन्स केमिकल्स अँड मटेरियल्स लिमिटेड कंपनीची स्थापना 2022 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः पेट्रोकेमिकल्स, विनाइल, हायड्रोजन आणि त्याची उप-उत्पादने, दुर्मिळ आणि औद्योगिक वायू, जैव ऊर्जा उत्पादने आणि कार्बन फायबर यांच्या निर्मितीचा व्यवसाय करते.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2815 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म UBS ने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3,420 रुपयेवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजने देखील रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3,380 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर BofA सिक्युरिटीजने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 3,250 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 10 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं