वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचे ४१ लाख मतदारांना वाटत नाही: सुजात आंबेडकर

कल्याण : भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा पडल्या तर, त्याच्या थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झाल्याचं आकडेवारी स्पष्ट सांगते. तसेच लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या सभांना देखील भाजपने पैसा\पुरवल्याचा दावा अनेकांनी केला होता. लोकसभा निवडणुकीत लढवून देखील वंचित आघाडीने केवळ औरंगाबादची जागा जिंकली होती आणि त्याला देखील स्थिक राजकीय समीकरणं जवाबदार होती. प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत स्वतः प्रकाश आंबेडकर दोन जागांवरून लढले तरी पराभूत झाले आणि सोलापूरच्या जागेवर तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अशी अस्वथा झाली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी देखील मुस्लिम समाजाची मतं पडली नसल्याचा आरोप एमआयएम’वर केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीवर पुन्हा तोच आरोप होऊ लागला आहे.
मात्र या प्रश्नाला प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी उत्तर दिल आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘उत्तर देताना अस कोण बोलतंय, हे अजून मला कळलेलं नाही. जे काही जण बोलतात त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादीशी काही ना काही छोटा मोठा संबंध आहे. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे हे महाराष्ट्रातील ४१ लाख मतदाराना तरी वाटत नाही, असा टोला सुजाता आंबेडकर यांनी विरोधकांना लगावला.
भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विदयार्थी आंदोलन सम्यक संवाद मेळावा कल्याण पूर्वे येथील लोकग्राम परिसरातील दर्शन हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र व वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, वंचित आघाडीचे प्रवक्ता दिशा पिंकी शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सुजात आंबेडकर यांनी आजचा तरुण खूप वेगळा आहे आणि खूप बदलेला आहे आजच्या तरुणाला इकॉनॉमिक्स कळतं पैसा कसा खेळतो ते कळतं, त्याला राजकरण कळतं त्याला इंटरनेट टेक्नॉलॉजी कळते जगात घडणाऱ्या घटना कळतात ते स्वतःच भूमिका घेतात आणि जगासमोर त्यांच्या भुमिका मांडतात, त्यांनी समाज माध्यमं त्यांच्या हातात घेतलेली आहेत, सगळ्याना वंचित आघाडीबाबत जाणून घ्यायचं असत म्हणून युट्युबवर सर्च मध्ये टॉप वर आहे असे सांगितले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं