Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अदानी आणि हिंडनबर्ग प्रकरणानंतर या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले होते, त्यांतून शेअर अजून सावरू शकले नाही. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 450 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ब्रोकरेज फर्मने अदानी विल्मर स्टॉकवर पुढील 12 महिन्यांसाठी 480 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी अदानी विल्मर स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 330.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील एका वर्षात अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 480 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 45 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून देऊ शकतो. नुवामा इन्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, हेजिंग लॉसमुळे अदानी विल्मर कंपनीचे प्रॉफिट मार्जिन कमी झाले आहे. कच्च्या मालाच्या किमतींमधील चढ-उतार हे देखील कंपनीसमोर आव्हाने वाढवत आहेत.
मार्च 2024 तिमाहीत अदानी विल्मर कंपनीचे महसूल संकलन 4.6 टक्के घटले होते. आणि EBITDA वार्षिक आधारावर 0.5 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र कंपनीचा PAT वार्षिक आधारावर 67.5 टक्के वाढला आहे. या कंपनीने मार्च तिमाहीत 2.7 टक्के एबिटा मार्जिन नोंदवला आहे. वार्षिक आधारावर कंपनीचा एबिटा मार्जिन सपाट राहिला आहे, तर तिमाही आधारावर त्यात 123 अंकाची घसरण झाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 14.53 टक्के खाली आली आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Wilmar Share Price NSE Live 13 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं