MIDC पोलीस स्टेशन: डान्सबार कारवाईत पोलीस आयुक्तांकडून भेदभाव; पोलीस दलात तीव्र नाराजी

मुंबई : मुंबई शहरात अवैध्यरित्या सुरु असलेल्या डान्सबार’वरील पोलीस कारवाई पाठोपाठ त्या स्थानिक ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या निलंबनाच्या कठोर कारवाईमुळे सध्या मुंबई शहर पोलिसांमध्ये दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी (MIDC Police Station) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईट लव्हर्स बारवरील कारवाईनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांची केवळ परिवहन प्रादेशिक विभाग कंट्रोल रूम येथे तात्पुरत्या स्वरूपात बदली करून थेट प्रकरण दडपण्याच्या हेतूनेच ती प्रेरित असलायचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आलं आहे.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे हे एमआयडीसी पोलीस ठाणे येथून अजून कार्यमुक्त झाले नसले तरी त्यांची बदली एटीएस मध्ये आधीच झालेली आहे. मात्र त्यांच्या हद्दीतील बारवर झालेल्या कारवाईमुळे त्यांना विषय थंड होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंट्रोल रूमला बदली दाखविण्यात आली आहे. त्यानंतर प्रकरण पूर्णपणे शांत होताच आणि प्रसारा माध्यमांचे दुर्लक्ष होताच त्यांना कार्यमुक्त करून एटीएस येथे धाडण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अलकनुरे यांच्यावर पोलीस आयुक्त बर्वे विशेष मेहेरबान झाल्याचं प्रसार माध्यमांच्या निदर्शनास आलं आहे. तसेच आयुक्तांची नितीन अलकनुरे यांचावर इतकी मेहेरबानी का? असा प्रश्न पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पडला असून त्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरु असल्याची माहिती आहे.
तत्पूर्वी याच अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी (MIDC Police Station) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोज बार वर समाजसेवा शाखेने टाकलेल्या धाडीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक अमलदार यांना थेट निलंबित करून बळीचे बकरे बनविण्यात आले होते आणि त्यावेळी देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलकनुरे यांना अभय देण्यात आले होते. तसेच ताडदेवमधील इंडियना बारवरील छाप्यानंतर पोलीस हवालदार विश्वनाथ सासवे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ग्रॅंटरोड येथील गोल्डन गुंज डान्सबारवर टाकलेल्या धाडीतनंतर करण्यात आलेल्या तडकाफडकी कारवाईत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांचे निलंबन झाले होते. तर बोरिवली येथील सूर संगीत बारवरील कारवाईत कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांच्यासोबत दोन अधिकारी आणि एक अमलदार यांचावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली होती.
मात्र एमआयडीसी पोलीस हद्दीतील बार वर पडलेल्या सलग धाडीनंतर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलकनुरे यांचं निलंबन झालेले नाही हे विशेष. तसेच त्यांचा सत्तेत गॉडफादर असल्यामुळे आयुक्त दबावाखाली आल्याची चर्चा संपूर्ण पोलीस खात्यात रंगली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं