Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉकचार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने अशोक लेलँड स्टॉकची टारगेट प्राइस 230 रुपयेवरून वाढवून 260 रुपये केली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
CITI ने या कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 215 रुपयेवरून वाढवून 245 रुपये केली आहे. CLSA ने या कंपनीची टार्गेट प्राइस 238 रुपयेवरून वाढवून 258 रुपये केली आहे. जेपी मॉर्गन फर्मने अशोक लेलँड शेअर्सला ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन टार्गेट प्राइस 235 रुपये केली आहे. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 5.78 टक्के वाढीसह 236.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्च 2024 तिमाहीत अशोक लेलँड कंपनीचा EBITDA मार्जिन 11 टक्केवरून वाढून 14.1 टक्के झाला आहे. अशोक लेलँड ही कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत अशोक लेलँड कंपनीच्या व्यवसाय व्यवस्थापनाचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. ही कंपनी आपल्या इलेक्ट्रिक सीव्ही व्यवसायाबाबत उत्साही आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अशोक लेलँड कंपनी दर दोन महिन्यात नवीन वाहन लाँच करणार आहे. अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकचे सरासरी वय 10 वर्षे आहे. पूर्वी हे वय 7-8 वर्षे होते. 2025-26 पर्यंत अशोक लेलँड ही कंपनी 500-700 कोटी रुपये कॅपेक्स करेल. याशिवाय अशोक लेलँड कंपनी स्विच मोबिलिटी आणि ओम मोबिलिटी या उपकंपन्यांमध्येही मोठी गुंतवणूक करणार आहे.
मागील एका वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 25 टक्के वाढवले आहेत. 2024 या वर्षात अशोक लेलँड स्टॉक 20 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 65,406 कोटी रुपये आहे.
अशोक लेलँड ही कंपनी हिंदुजा समुहाचा भाग असलेली कंपनी आहे. मार्च 2024 तिमाहीत अशोक लेलँड कंपनीने EBITDA मार्जिन 14.1 टक्के नोंदवले आहे. मार्च 2024 मध्ये अशोक लेलँड कंपनीचा EBITDA तिमाही आधारावर 1592 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर वार्षिक आधारावर कंपनीच्या EBITDA मधे 24.8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च तिमाहीत अशोक लेलँड कंपनीचा महसूल 3.1 टक्के घटून 11267 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 19.8 टक्के वाढीसह 900.4 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. अशोक लेलँड कंपनीकडे 1658 कोटी रुपये कॅश इन हॅण्ड आहेत.
मार्च 2024 तिमाहीत अशोक लेलँड कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्के वाढीसह 38367 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीचा ऑपरेटिंग पीबीटी 92 टक्के वाढीसह 3886 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च तिमाहीत अशोक लेलँड कंपनीचा निव्वळ नफा 90 टक्के वाढीसह 2618 कोटी रुपये नोंदवला गेला होता. याच तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 12 टक्के नोंदवला गेला आहे. मागील वर्षी हे प्रमाण 8.1 टक्के होते. सध्या अशोक लेलँड कंपनीवर 89 कोटी रुपये कर्ज आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 03 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं