Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स मिळवा! 68 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 3119% परतावा

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. ( अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनी अंश )
अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 70 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स स्टॉक 2.25 टक्के वाढीसह 68.80 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकालावधीत 3119 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जून 2024 रोजी अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालकांनी मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मजबूत केला होता. हा अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीचा पहिलाच बोनस इश्यू असेल. या कंपनीने मार्च 2022 मध्ये 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केला होता. या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश दिलेला नाही.
31 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 71.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 945.12 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 73.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 19.30 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 272 टक्के वाढले आहेत.
YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 155.5 टक्के वाढली आहे. मागील 5 वर्षांत अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स स्टॉक 963.56 टक्के मजबूत झाला आहे. 16 मार्च 2012 रोजी अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनीचे शेअर्स 2.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स ही कंपनी हेवी फॅब्रिकेशन उद्योगासाठी संपूर्णपणे एकात्मिक वन-स्टॉप शॉप सोल्युशन प्रदान करते. या कंपनीने वीज, रेल्वे, रस्ते, महानगर, औद्योगिक आणि निवासी उद्योगांना महत्त्वपूर्ण पायाभूत सेवा सुविधा प्रदान केल्या आहेत. या कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये L&T, Tata Projects, AFCONS, Shahpoorji, APCO यासारख्या कंपन्या सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bonus Share News on Alliance Integrated Metaliks 05 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं