Wipro Share Price | भरवशाचा IT स्टॉक! विप्रो शेअरबाबत फायद्याची अपडेट, सुसाट तेजीत परतावा देणार

Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला अमेरिकेतून एक ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे एका दिवसात या स्टॉकने 5 टक्केची उसळी घेतली होती. विप्रो स्टॉक शुक्रवारी 47.95 रुपये किमतीवर ओपन झाला होता. काही वेळात हा स्टॉक 5.33 टक्के वाढीसह 485 रुपये किमतीवर पोहचला होता.
सध्या विप्रो स्टॉक 546.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपासून लांब आहे. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी विप्रो स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 484 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला अमेरिकेतून 5 वर्षांसाठी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. अमेरिकेतील आघाडीच्या कम्युनिकेशन सर्व्हिसेस प्रोव्हायडर कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 500 दशलक्ष डॉलर्स असल्याची माहिती मिळत आहे. ज्या कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे, तुमचे नाव विप्रो कंपनीने अद्याप सार्वजनिक केलेले नाही.
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीच्या मते, हा कॉन्टॅक्ट विप्रो कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या करारामुळे कंपनीच्या महसुलात मजबूत वाढ होऊ शकते. मात्र शेअर बाजारातील 45 पैकी 23 तज्ञांनी हा विप्रो स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 13 जणांनी हा स्टॉक होल्ड करण्याची शिफारस केली आहे.
मागील 1 वर्षात विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता मॉर्गन स्टॅनलीच्या मते, विप्रो स्टॉक पुढील काळात 421 रुपये किमतीवर येऊ शकतो. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12 टक्के कमी आहे. विप्रो कंपनीचे प्रवर्तक अझीम हसन प्रेमजी यांनी कंपनीचे 20.70 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Wipro Share Price NSE Live 08 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं