Ujjivan Small Finance Bank Share Price | शेअर प्राईस ₹45, हा शेअर 60% परतावा देईल, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड

Ujjivan Small Finance Bank Share Price | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक अनेक ब्रोकरेज फर्मच्या रडारवर आला आहे. अनेक तज्ञांनी या स्टॉकबाबत संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, या बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेच्या दबावामुळे कर्ज वितरणमध्ये किंचित मंदी पाहायला मिळू शकते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. ( उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक अंश )
आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक 1 टक्के घसरणीसह 45.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म सेंट्रम ब्रोकिंग फर्मने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस 74 रुपयेवरून किंचित कमी करून 72 रुपये केली आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 60 टक्के नफा कमावून देऊ शकतो. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 65 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एचएसबीसी फर्मने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉकची टारगेट प्राइस 58 रुपयेवरून 53 रुपये केली आहे.
डॅम कॅपिटल फर्मने या शेअरची टार्गेट प्राइस 64 वरून 61 रुपये केली आहे. जेएम फायनान्शियल फर्मने या स्टॉकची टारगेट प्राइस 72 रुपयेवरून 65 रुपये केली आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे लोन बुक ग्रोथ गाइडेंस 25 टक्क्यांवरून कमी करून 20 टक्के केले आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष 2024-2025 साठी क्रेडिट कॉस्ट 1.4 टक्क्यांवरून कमी करून 1.7 टक्क्यांवर आणली आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे ROE गाइडेंस 22 टक्केवरून 20 टक्केपर्यंत कमी झाले आहे. NIM गाइडेंस 9 टक्केवर आले आहे. पुढील 6 ते 9 महिन्यांत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक युनिव्हर्सल बँकेचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने गोल्ड लोन शाखा 259 वरून 441 पर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या लोन बुकमधील 70 टक्के वाटा MFI चा आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या उत्पन्नाचा अंदाज कमी करण्यात आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ujjivan Small Finance Bank Share NSE Live 25 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं