IREDA Share Price | PSU शेअर ब्रेकआऊट देणार, शेअरची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राइस तपासून घ्या

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. गुरुवारी हा स्टॉक 4.5 टक्के वाढीसह 205.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर हा स्टॉक प्रॉफिट बुकींगमुळे 193.30 रुपये किमतीवर आला होता. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ( आयआरईडीए कंपनी अंश )
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर आयआरईडीए कंपनीचे 63.24 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. तर NSE वर 10.05 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.29 टक्के घसरणीसह 190.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका आठवड्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्क्यांनी वाढली आहे. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक सकारात्मक तरतुदीची घोषणा होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकार आयकर कायद्याच्या कलम 54EC अंतर्गत आयआरईडीए आणि HUDCO या दोन सरकारी कंपन्यांना बाँड खरेदीबाबत दीर्घकालीन भांडवली नफा करातून सूट देणार आहे. आयकर कायद्याच्या कलम 54EC नुसार, जमीन आणि घर यांसारख्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही.
रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन सारख्या सरकारी कंपन्या आयकर कायद्याच्या कलम 54EC मंतर्गत कर सूटसाठी पात्र आहेत. एंजेल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक टेक्निकल चार्टवर अपट्रेंडचे संकेत देत आहे. टेक्निकल चार्टवर आयआरईडीए स्टॉकला 170-160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये तेजी पाहण्यासाठी शेअर 195-200 रुपयेच्या पार जाणे आवश्यक आहे.
चॉईस इक्विटी ब्रोकिंग फर्मने आयआरईडीए स्टॉकवर 203 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात स्वच्छ आणि हरित ऊर्जेवर अधिक भर देणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर IREDA शेअर्सने मजबूत चढ-उतार अनुभवले आहे. जर हा स्टॉक 200 रुपयेच्या पार गेला तर शेअर 225 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. जर हा स्टॉक 160 रुपये किमतीच्या खाली गेला तर शेअर 130 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IREDA Share Price NSE Live 28 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं