Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस अपग्रेड, फायदाच फायदा

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 17 टक्क्यांनी वाढू शकतो. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 3,580 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 28 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3060.95 रुपये किमतीवर ओपन झाला होता. मात्र नंतर शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह 3161.45 रुपये किमतींवर पोहोचला होता. दिवसाअखेर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 3131.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21 लाख कोटीं रुपयेपेक्षा जास्त आहे. मागील एका वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक तब्बल 34 टक्क्यांनी वाढला आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.12 टक्के घसरणीसह 3,126.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जेफरीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2024-27 दरम्यान जिओ कंपनीचा महसूल 18 टक्के CAGR दराने आणि निव्वळ नफा 26 टक्के CAGR दराने वाढू शकतो. Jio कंपनीने 13-25 टक्के टॅरिफ वाढवल्यानंतर जेफरीजने कंपनीचा महसूल अंदाज 3 टक्के कमी केला आहे. मॉर्गन स्टॅन्लेने फर्म रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 3,046 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.
मॉर्गन स्टॅनली फर्मला अपेक्षा आहे की, जर जिओ कंपनीने पुढील 20 टक्के दर वाढ केली तर कंपनीच्या कमाईमध्ये 10-15 टक्के वाढ होऊ शकते. रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक कव्हर करणाऱ्या 35 तज्ञापैकी 28 जणांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. 5 जणांनी हा स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तर 2 तज्ञांनी स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 01 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं