शिवसेनाप्रमुख जयंती ‘सरकारी’ होणार

मुंबई : ४० पेक्षा अधिक वर्षे राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती भावी पिढीसमोर चिरंतन रहावी, यासाठी शिवसेनाप्रमुखांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुंबई महानगरपालिका सभागृहात उचलून धरली होती. या मागणीला विरोधी पक्षातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यानंतर या प्रस्तावाला अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे.
शिवसेनाप्रमुखांनी आपल्या तब्बल ४६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कोणतीही निवडणूक न लढवता राज्यातील राजकारणावर दबदबा कायम ठेवला होता. मराठी माणसांच्या हृदयात त्यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे. तसेच त्यांच्याच छत्रछायेखाली राज्यात शिवसेनेचे अनेक नेते घडले. परंतु राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासंबंधातील सरकारच्या ३० नोव्हेंबर २०१५ च्या परिपत्रकानुसार शिवसेनाप्रमुखांचे नाव त्यात नाही. याबाबत शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून शिवसेनाप्रमुखांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याची मागणी केली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं